एक आठवडाभर एकदम धावपळीचा गेलाय. आणि दमूनदमून गेलाय जीव.
खूप दमल्यानंतर जास्त काही जेवायल-खायला नको वाटतं उतरत्या वयात. तसंच वाटतं तापातून उठल्यावरही. भुकेचा आगडोंब उसळतच नाही जठराग्नी विझून अगदीच मंदमंद झालेला असतो. तो चेतवायचा तर त्यावर एकदम जड जेवणाचे ओंडके टाकून चालत नाही. हलकंसं अग्नी फुलवेल असं सुक्या पालापाचोळ्यासारखं अन्न हवं. मग मऊ भातच खावा. आणि त्याच्याबरोबर शाकाहारी लोक लिंबाचं लोणचं, मेतकूट घेतात. त्याऐवजी मांसाहारी, मत्स्याहारी लोक काय बरं घेणार?
पचायला अगदी सोप्पं आणि करायलाही अगदी सोप्पं.
भाजलेले बोंबील.
बोंबील भाजताना त्याच्या पोटातला वाळलेला भाग काढून टाकावा. कडेचे परही कापून टाकावेत. डोकी तर काढून ठेवलेलीच असतात, साठवणीच्या बोंबलाची.
मग बोंबील जरा जाडे असतील तर उभे चिरावेत. फार जाडे असतील तर उभे दोनदा चिरावेत आणि मग चुलीत भाजावेत, किंवा गॅसवर जाळी धरून भाजावेत.
बारीक बोंबील असतील तर- मला स्वतःला बारीक बोंबील, अगदी बारीक नेरल्याच पसंत- त्यांचे तीनतीन इंचांचे तुकडे करून कढई तापवून त्यात भाजावेत. जरा भाजले गेल्यावर त्यावर एखादा चमचा तेल घालावं.
आणि मग असे भाजलेले बोंबील सोबत घेऊन, मीठ घालून, चमचाभर तूप घालून शिजवलेला सुवासिक मऊ भात वाढून घ्यावा...
मंदावलेली भूक एखादी हलकीशी उडी तर नक्कीच मारते...
भाजलेले सुके बोंबील हे थकल्याभागल्या जीवाच्या रसनेत चवीची फुंकर मारण्याचं पहिलं साधन म्हणावं.

वाह छान आजचा प्रयोग नक्की... मुग्धा ताई तुम्हाला कल्पना नाही तुमचं हे सुकटायन अगदी जीवाला आधार आहे माझ्या. खूप धन्यवाद
ReplyDeleteमस्त मस्त
ReplyDelete