काश्मीरमधेही गोड्या
पाण्याचे मासे सुकवून खायची जुनी पध्दत आहे. आमचा एक काश्मिरी मित्र घरी यायचा.
त्याला आमच्याकडे सुकट-सोडे खायला प्रचंड आवडत असे. फोन करून फर्माइश करून ठेवून
मगच यायचा. या काश्मिरी पंडिताला सुक्याची चव कशी लागली असेल... प्रश्न पडायचा. तर
त्याने सांगितलं की काश्मीरमधेही विशेषतः कडक हिंवाळ्यात सुकवलेले मासे खायची
पध्दत आहे.
या वर्षी महालक्ष्मी सरसमधल्या
एका काश्मिरींच्या स्टॉलवर असलेल्या दोन तरुण मुलांशी गप्पा काढल्या. आणि हळूच
त्यांना विचारून घेतलं काश्मिरातल्या सुक्या माशांबद्दल.
सुकवलेल्या माशांना
काश्मिरी भाषेत होख् गाद् म्हणतात किंवा काही लोक होश् गाद म्हणतात म्हणाले. होख् किंवा होश् म्हणजे सुके आणि गाद् म्हणजे मासे. गोड्या पाण्यातलेच मासे सुकवण्याची पध्दत आहे.
हमारे तालाब का मीठा पानी का मछ्छी एकदम प्यिवर रहता है दीदी. वो खाएंगे तो कुछ
तकलीफ नहीं होता दीदी.
विचारलं, सगळे काश्मिरी
लोक खातात की काहीजण खातात?
“नहीं, दीदी, सब लोग खाते हैं. दुकान में मिलता है. अच्छी तऱहें फ्राय करकरके उसको
तेल में अच्छासे बनाकर सब लोग खाते हैं.”
लोक उन्हाळ्यात मासे
सुकवून ठेवतात. आणि हिंवाळ्यात बर्फात कोंडून घातले गेले की मग फारच आवडीने खातात.
या होश् गाद् मध्ये
पालेभाज्या, विशेषतः एक पातीसारखी तळ्याजवळ पिकणारी भाजी असते- तिला बुम म्हणतात-
ती चिरून त्यात तळून घेतलेले होश् गाद् टाकून पुन्हा मिरचीपूड टाकून शिजवून घेतात.
भरपूर तेल असतं.
रोटी किंवा चावलबरोबर
खाण्याची पध्दत आहे.
No comments:
Post a Comment